Virat Kohli  X
Sports

Virat Kohli Out : RCBला मोठा झटका; विराट कोहली तंबुत परतला, अर्धशतक हुकलं

Virat Kohli Latest News : आरसीबीला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली झेलबाद झाला आहे. त्याचं अर्धशतक देखील हुकलं.

Vishal Gangurde

आरसीबी आणि पंजाब किंग्समध्ये अतितटीचा सामना सुरु आहे. या अंतिम सामन्यात आरसीबीचे फलंदाज संयमाने खेळताना दिसत आहेत. दुसरीकडे आरसीबीच्या फलंदाजांना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा भेदक मारा सुरु आहे. पंजाबने आतापर्यंत आरसीबीचे चार गडी बाद केले आहेत. पंजाबने विराट कोहलीलाही बाद केलं. विराट कोहली कॅच आऊट होऊन ४३ धावांवर बाद झाला. यामुळे विराटचं अर्धशतक थोडक्यात हुकलं.

आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. पंजाग किंग्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने प्लेइंग इलेवनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. या सामन्यात आरसीबीची सुरुवात चांगली राहिली नाही. फिल सॉल्ट ९ चेंडूत तंबूत परतला.

फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर विराट कोलहीने मयंक अग्रवालच्या साथीने ३८ धावांची भागीदारी रचली. कर्णधार रजत पाटीदार १६ चेंडूवर २६ धावा करून बाद झाला. त्याने कोहलीसोबत ४० धावांची भागीदारी रचली. पुढे १५ व्या षटकात विराट कोहली बाद झाला. विराटने लिविंगस्टोनसोबत चौथ्या विकेटसाठी ३५ धावा कुटल्या होत्या.

विराटने रचला इतिहास

पंजाब किंग्सच्या विरोधात विराट कोहलीचं अर्धशतक हुकलं. मात्र, त्याने नवा इतिहास रचला. विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा शिखर धवनचा विक्रम मोडला. धवनने २२१ डावात ७६८ चौकार लगावले होते. धवनचा हाच विक्रम विराटने मोडला. विराट कोहलीने २५८ डावात हा विक्रम केला. तर डेविड वॉर्नर ६६३ चौकारांवर तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT