rcb vs lsg ipl 2024 virat kohli played his 100th match at m chinnaswamy stadium cricket news amd2000 yandex
Sports

Virat Kohli Record News: विराटचं अनोखं शतक! मैदानात उतरताच मोठ्या रेकॉर्डची नोंद; रोहित,धोनीला सोडलं मागे

Most T20 matches at a venue: बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ आमने सामने आले आहेत

Ankush Dhavre

Virat Kohli Record, RCB vs LSG IPL 2024:

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ आमने सामने आले आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना विराट कोहलीसाठी अतिशय खास आहे. मैदानात उतरताच त्याच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे.

विराटचं अनोखं शतक....

विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करतोय.या संघासाठी त्याने आतापर्यंत २४१ सामने खेळले आहेत. दरम्यान लखनऊ सुपरजायट्ंस संघाविरुद्ध सुरु असलेला सामना हा त्याचा एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील १०० वा सामना आहे.

यासह विराट कोहली एकाच मैदानावर १०० सामने खेळणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत ८० सामने खेळले आहेत. तर चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीने चेपॉकच्या मैदानावर ६९ सामने खेळले आहेत. (Cricket news in marathi)

आयपीएल स्पर्धेत एकाच मैदानावर सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय खेळाडू..

विराट कोहली -१०० सामने

रोहित शर्मा- ८० सामने

एमएस धोनी - ६९ सामने

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), रिस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपर जाएंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन उल हक, मयंक यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Todays Horoscope: आजच्या दिवशी कोणाच्याही मदतीची अपेक्षा करू नका, वाचा राशीभविष्य

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

SCROLL FOR NEXT