RCB vs LSG IPL 2024 Playing XI Prediction Royal challengers bangalore vs lucknow super giants playing 11 news in marathi amd2000 twitter
Sports

RCB vs LSG, IPL 2024: बंगळुरु- लखनऊ येणार आमने-सामने! केएल राहुल खेळणार का? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

RCB vs LSG, Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

RCB vs LSG, Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. १-१ सामना जिंकून आलेले दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात असणार आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाबद्दल बोलायचं झालं तर या संघाने २ सामने खेळले आहेत.

यापैकी १ सामना जिंकला असून एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ३ पैकी २ सामने गमावले असून केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

लखनऊ सुपरजायंट्सने गेल्या सामन्यात शानदार कामगिरी करत पंजाब किंग्ज संघावर २१ धावांनी विजय मिळवला. तर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाला गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कमबॅक करण्यासाठी आपल्या प्लेइंग ११ मध्ये बदल करु शकतो.

आरसीबीची प्लेइंग ११ बदलणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवा जाऊ शकतो.

त्याच्याजागी लॉकी फर्ग्युसनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. यासह रजत पाटीदारला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी महिपाल लोमरोरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. यासहा गेल्या सामन्यात लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या विजयकुमार वैशाख इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसून येऊ शकतो. (Cricket news in marathi)

लखनऊची प्लेइंग ११ बदलणार?

गेल्या सामन्यात केएल राहुल खेळताना दिसून आला होता. मात्र त्याने संघाचं नेतृत्व केलं नव्हतं. त्याच्याऐवजी निकोलस पुरन संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. तर केएल राहुलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला होता. आज होणाऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवलं. तर त्याच्याऐवजी दिपक हुड्डाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, लॉकी फर्ग्यूसन, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट प्लेअर- विजयकुमार वैशाख.

लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल/दीपक हुड्डा, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, रवि बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

SCROLL FOR NEXT