RCB vs GT shubman gill statement after defeat against royal challengers bangalore amd2000 saam tv
Sports

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

RCB vs GT, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना गिलने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. गुजरातने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ७ सामने गमावले आहेत. ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.

या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने म्हटलंय की, आमचा संघ यापुढील सर्व सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाचा डाव १९.३ षटकात १४७ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १३.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

या पराभवानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' खूप काही गोष्टी खेळपट्टीवर अवलंबून आहेत. पहिल्या षटकापासूनच अंदाज येतो की खेळपट्टी कशी असेल. त्यानुसार खेळ करावा लागतो. या खेळपट्टीवर १७०-१८० धावा करणं आव्हानात्मक ठरलं असतं. पावरप्लेमध्ये आमची फलंदाजी आणि त्यांची गोलंदाजी निर्णायक ठरली. आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि पुढील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू.'

तसेच या सामन्यात विजय मिळवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने म्हटले की, ' गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही गोलंदाजीत आणि फलंदाजीतही शानदार कामगिरी केली आहे. १८०-१९० धावसंख्या उत्तम आहे.' या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाचा डाव १९.३ षटकात संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १३.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

SCROLL FOR NEXT