RCB Vs GT Saam Digital
Sports

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans/IPL2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आज घरचा मैदावर मोठा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सला धूळ चारत १० व्या क्रमांकावरून थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Sandeep Gawade

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आज घरचा मैदावर मोठा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सला धूळ चारत १० व्या क्रमांकावरून थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातने १४७ धावा करत १४८ धावांचं लक्ष्य बेंगळुरूसमोर ठेवलं होतं. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अवघ्या १४ षटकात बेंगळुरूने हे लक्ष्य गाठलं.

वेगवान गोलंदाजांच्या जोरावर बेंगळुरूने गुजरातला अवघ्या 147 धावांत गुंडाळलं होतं. मोहम्मद सिराजसह वेगवान गोलंदाजांनी आज चांगलं प्रदर्शन केलं. यानंतर फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने पॉवरप्लेमध्ये झटपट 92 धावा जोडून विजयाचा पाया रचला. डु प्लेसिसने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. मात्र, त्यानंतर 25 धावांत 6 गडी गमावल्याने बेंगळुरू अडचणीत सापडला होता. मात्र दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी संघाला विजय मिळवून दिला. बेंगळुरूचा हा सलग तिसरा विजय आहे, तर गुजरातचा सलग तिसरा पराभव.

तत्त्पूर्वी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १४७ धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी तर पार गुडघे टेकले. गुजरातच्या एकाही फलंदाजाला ४० धावांचा आकडा गाठता आला नाही. साहा, गिल आणि साई अनुक्रमे १,२ आणि ६ धावा करून तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान (३७) आणि डेव्हिड मिलरने (३०) संघाचा डाव सावरला, पण त्यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport Launching : नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्र्यांनी दाखवलं विमानाचे तिकिट, एअरपोर्ट सुरू होण्याची तारीखही सांगितली

भाजप नेत्याची मध्यरा‍त्री गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवर आलेल्या दोघांनी अंधारात डाव साधला

दुसऱ्यासोबत बायको OYO Hotel मध्ये, अचानक नवऱ्याची झाली एन्ट्री, धांदल उडताच बाल्कनीतून उडी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्व परमिट रुम, बार आणि लाउंज उद्या राहणार बंद

Plastic Use: सावधान! घरात, ऑफिसमध्ये प्लास्टिकचा वापर करताय? तर ही बातमी वाचाच, अन्यथा...

SCROLL FOR NEXT