RCB Vs GT  Saam Digital
क्रीडा

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Royal Challengers Bengaluru Vs Gujarat Titans/IPL2024: एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल्स चॅलेंजर्सच्या बेंगळुरुच्या गोलंदाजांना गुजरात टायटन्सला १४७ धावांवर रोखण्यात यश आलं. बेंगळुरुच्या संघाची आज सांघिक कामगिरी पहायला मिळाली.

Sandeep Gawade

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल्स चॅलेंजर्सच्या बेंगळुरुच्या गोलंदाजांना गुजरात टायटन्सला १४७ धावांवर रोखण्यात यश आलं. बेंगळुरुच्या संघाची आज सांघिक कामगिरी पहायला मिळाली. IPL 2024 च्या आजच्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. बऱ्याच दिवसांनंतर बेंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत आहे. या मैदानावर बेंगळुरूला ४ पैकी ३ सामने गमवावे लागले आहेत.

आरसीबीच्या गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी तर पार गुडघे टेकले. गुजरातच्या एकाही फलंदाजाला ४० धावांचा आकडा गाठता आला नाही. साहा, गिल आणि साई अनुक्रमे १,२ आणि ६ धावा करून तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान (३७) आणि डेव्हिड मिलरने (३०) संघाचा डाव सावरला, पण त्यांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

त्यानंतर आलेल्या राहुल तेवतियाने २१ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह ३५ धावा केल्या. तर राशीद खान १८ धावांवर तर विजय शंकर १० धावांवर बाद झाला. मानव सुतार, मोहित शर्मा आणि नूर अहमद हे शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर बाद झाले. आरसीबीकडून सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. तर कर्ण शर्माला एक विकेट मिळवण्यात यश आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

IPL 2024 Mega Auction: IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

SCROLL FOR NEXT