RCB vs DC WPL Final 2024 know the full prize money recieved by WPL 2024 Winner orange cap purple cap winner  twitter
Sports

WPL Prize Money: WPL विजेत्या RCB वर कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या अन् ऑरेंज-पर्पल कॅप विनर्सला किती रक्कम मिळाली?

WPL Final 2024: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत इतिहासाला गवसणी घातली आहे

Ankush Dhavre

WPL Prize Money 2024:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत इतिहासाला गवसणी घातली आहे. १६ वर्षांच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली आहे.

जे विराट कोहली, केविन पीटरसन राहुल द्रविड आणि विटोरीसारख्या दिग्गजांना नाही जमलं ते स्मृती मंधानाने करून दाखवलं आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पैशांचा पाऊस पाडला गेला आहे. दरम्यान किती रक्कम मिळाली? जाणून घ्या.

या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटींवर समाधान मानावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्या वर्षी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

स्पर्धेतील पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर सलग दुसऱ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्लीचा संघ तुफान फॉर्ममध्ये होता. यावर्षीही दिल्लीने सर्वात आधी फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Cricket news in marathi)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून श्रेयांका पाटीलने शानदार गोलंदाजी केली. तिने या स्पर्धेत सर्वाधिक १३ गडी बाद केले. यासह ती पर्पल कॅपची मानकरी ठरली आहे. तर एलिस पेरीने शानदार फलंदाजी केली. तिने ३४७ धावा केल्या. यासह ती ऑरेंज कॅपची मानकरी ठरली आहे. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी ५-५ लाख रुपये मिळाले.

तर दिप्ती शर्माला मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअरचा पुरस्कार मिळाला. तिला देखील ५ लाख रुपये मिळाले. यासह एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावणाऱ्या श्रेयांका पाटीलला देखील ५ लाख रुपये मिळाले. या सामन्यात ३ गडी बाद करणारी सोफी सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीचा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३ चेंडू आणि ८ गडी राखून पूर्ण केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT