DC vs RCB Final Match : आरसीबीच्या गोलंदाजांचा भेदक मारा; दिल्लीकडून बेंगळुरूला ११४ धावांचं आव्हान

DC vs RCB Final Match : श्रेयांका पाटील आणि मोलीन्यूक्सच्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने दिल्लीला ११३ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे दिल्लीने आरसीबीला ११४ धावांचं आव्हान दिलं आहे.
DC vs RCB Final
DC vs RCB Final Saam tv
Published On

DC vs RCB Final :

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेजंर्स बँगलोरदरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये वुमेन प्रिमियर लीगचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात आरसीबीने १८.३ षटकात ११३ धावा कुटल्या. श्रेयांका पाटील आणि मोलीन्यूक्सच्या चमकदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने दिल्लीला ११३ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे दिल्लीने आरसीबीला ११४ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

दिल्लीचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला. दिल्लीकडून शेफाली वर्मा आणि कर्ण मेग लैनिंगने डावाची सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करून आरसीबीच्या गोलंदाजांवर दबाव आणला.

DC vs RCB Final
Rupay Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्सचा अहमदाबाद डिफेंडर्सवर महत्वपूर्ण विजय

मात्र, आरसीबीच्या आठव्या षटकात फिरकीपटू मोलीन्यूक्सने शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद केलं. दिल्लीचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर संघावर दबाव वाढला. त्यानंतर श्रेयांका पाटीलने दिल्लीचं चालू दिलं नाही.

DC vs RCB Final
IPL Records: गेलचं विक्रमी शतक ते विराटचा कहर; IPL स्पर्धेतील हे रेकॉर्ड्स मोडणं कठीण नव्हे तर अशक्यच

दिल्ली संघाच्या एकही गडी बाद न होता ६४ धावा झाल्या होत्या. मात्र, आरसीबीच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फलंदाजांची घसरगुंडी झाली. दिल्ली संपूर्ण संघ ११३ धावांवर गारद झाला.

आरसीबीच्या श्रेयांका पाटीलने ४ गडी, मोलीन्यूक्सने तीन गडी आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे दिल्लीचे ९ फलंदाज हे आरसीबीच्या फिरकीपटूने घेतले. तर दिल्लीची राधा यादव धावचित झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com