RCB Vs CSK IPL 2025 X
Sports

RCB Vs CSK : धोनी तुला अजून खेळायला हवं होतं पण्...; थरारक सामन्यात बंगळुरूचा चेन्नईवर २ धावांनी विजय, मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान

RCB Vs CSK IPL 2025 : चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध चेन्नई या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आहे. या विजयासह बंगळुरूने १६ गुण मिळवले आहेत.

Yash Shirke

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीत आरसीबीचा विजय झाला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये चेन्नईचा फक्त २ धावांनी पराभव झाला आहे. या विजयासह १६ गुण मिळवून आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलवर पहिल्या क्रमावर गेला आहे. मुंबईचा संघ दुसऱ्या, तर गुजरातचा संघ तिसऱ्या स्थानी गेला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये आरसीबी सीएसकेवर वरचढ ठरली. पराभवला मी कारणीभूत आहे. मी काही शॉट्स मारायला हवे होते असे म्हणत धोनीने पराभव स्वीकारला.

आयपीएल २०२५ च्या ५२ व्या सामन्यामध्ये बंगळुरू विरुद्ध चेन्नई हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले. या सामन्यामध्ये एमएस धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. २० ओव्हर्समध्ये बंगळुरूच्या खेळाडूंनी २१३ धावा केल्या.

सलामीसाठी आलेल्या विराट कोहली आणि जेकब बेथल या सलामीवीरांनी अर्धशतकीय खेळी केली. जेकबने ६२ धावा, तर विराटने ५५ धावा केल्या. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्याची पकड आरसीबीच्या हातून निसटली. रजत पाटीदारसह देवदत्त पड्डीकल, टीम टेव्हिड आणि जितेश शर्मा लवकर बाद झाले. शेवटच्या ओव्हर्समध्ये ३७८ च्या स्ट्राईक रेटने ६ षटकार आणि ४ चौकार मारत रोमारिया शेपर्डने धावसंख्या २०० पार नेली.

आयुष म्हात्रे आणि शेख रशीद हे चेन्नईचे सलामीवीर फलंदाजीसाठी आले. १४ धावा करुन शेख रशीद माघारी परतला. मागच्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा सॅम करन ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या क्रमावर आलेल्या रवींद्र जडेजासह आयुष म्हात्रेने मोर्चा सांभाळला. दोघांनी मिळून शतकीय भागीदारी केली. आयुषने १९५.८३ च्या स्ट्राईक रेटने ५ षटकार आणि ९ चौकार मारत ९४ धावा केल्या. सलामीसाठी आलेला आयुष सतराव्या ओव्हरपर्यंत खेळला.

म्हात्रेच्या पाठोपाठ डेवॉल्ड ब्रेव्हिसही बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात उरतला. धोनीने ८ चेंडूत १२ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने चौथ्या चेंडूत षटकार मारत चेन्नईच्या विजयाच्या आशा वाढल्या. पण दुबे आणि जडेजाला शेवटच्या ३ चेंडूत फक्त ३ धावा काढता आल्या. धोनीच्या जागी शिवम दुबे फलंदाजीसाठी आला असता, तर चेन्नईला सामना जिंकता आला असता असे म्हटले जात आहे.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार) आयुष म्हात्रे, शेख रशीद, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीपक हूडा, अंशुल कम्बोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना

(इम्पॅक्टचे पर्याय - शिवम दुबे, आर. अश्विन, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ -

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, जेकब बेथल, देवदत्त पड्डिकल, रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल

(इम्पॅक्टचे पर्याय - सुयश शर्मा, रसिख डार, मनोज भांडगे, लियाम लिविंगस्टन, स्वप्नील सिंह)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT