rcb vs csk Fan changes jersey to chennai super kings to royal challengers bengaluru watch video amd2000 twitter
Sports

Viral Cricket Video: पलटूराम... Live मॅचमध्ये CSKच्या फॅनने बदलली जर्सी, RCBला करू लागला चीअर!

RCB Fan Viral Video: चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फॅनने जर्सी बदलल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्द या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना झाल्यानंतर एका फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या हजारो फॅन्सच्या गर्दीत काही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते असल्याचं दिसून येत आहे. अटीतटीच्या लढतीत दोन्ही संघांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती.

शेवटच्या षटकापर्यंत असं वाटत होतं की, चेन्नईचा संघ हा सामना जिंकणार. मात्र शेवटच्या षटकात यश दयालने शानदार गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईचा संघ पराभूत होतोय हे समजताच चेन्नईच्या चाहत्यांनी सीएसकेची जर्सी काढली आणि आरसीबीची जर्सी घालून आरसीबीला सपोर्ट करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या संघाचा एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे. या हंगामातील मजेशीर आकडेवारी म्हणजे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने मे महिन्यात खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला मे महिन्यात खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आरसीबीकडे ट्रॉफी जिंकण्याची संधी

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आजवर एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. १७ हंगामात या संघाने ९ वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या संघाने ३ वेळेस आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

SCROLL FOR NEXT