Will Jacks 5 Sixes twitter
Sports

Will Jacks 5 Sixes: 6,6,6,6,6 रिंकू सिंगनंतर RCB च्या फलंदाजाचा इंग्लंडमध्ये जलवा! एकाच षटकात मारले सलग 5 षटकार- VIDEO

5 Sixes Cricket Video: टी -२० ब्लास्ट स्पर्धेत विल जॅक्सने दमदार कामगिरी करत एकाच षटकात १,२ नव्हे तर तब्बल ५ षटकार खेचले आहेत.

Ankush Dhavre

T-20 Blast: आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंग नावाचं वादळ पाहायला मिळालं होतं. त्याने गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात यश दयालच्या एकाच षटकात सलग ५ षटकार मारले होते. यासह आपल्या संघाला हातातून निसटलेला सामना जिंकून दिला होता.

आता अशीच कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजाने करून दाखवली आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी -२० ब्लास्ट स्पर्धेत विल जॅक्सने दमदार कामगिरी करत एकाच षटकात १,२ नव्हे तर तब्बल ५ षटकार खेचले आहेत.

तर झाले असे की, सरे आणि मिडलसेक्स या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यातील ११ वे षटक टाकण्यासाठी ल्युक हॉलमन गोलंदाजीला आता होता. या षटकात त्याने ल्युक हॉलमनचा चांगलाच समाचार घेतला.

त्याने या षटकातील सुरुवातीच्या ५ चेंडूवर सलग ५ षटकार मारले. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून असं वाटू लागलं होतं की, आज युवराज सिंग आणि हर्षल गिब्सच्या रेकॉर्डची बरोबरी होणार. मात्र शेवटचा चेंडू हुकला आणि या विक्रमाची बरोबरी होता होता राहून गेली. (Latest sports updates in marathi)

दुखापतीमुळे राहिला होता संघाबाहेर..

विल जॅक्स हा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करतो. मात्र या हंगामात तो दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला होता. तो संघाबाहेर असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मध्यक्रमात त्याची कमतरता जाणवली होती.

या संघाने दमदार खेळ केला होता. मात्र हा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकला नव्हता. त्याची आक्रमक फलंदाजी पाहता असे दिसून येत आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात आता आक्रमक फलंदाज मिळाला आहे जो कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन तुफान फटकेबाजी करू शकतो. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३.२ कोटींची बोली लावत संघात स्थान दिले होते.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात विल जॅक्सने ४५ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सरे संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद २५२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मिडिलसेक्स संघाने ४ चेंडू शिल्लक ठेऊन या सामन्यात विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT