RCB may qualify for ipl 2024 playoffs after most consecutive win record amd2000 twitter
क्रीडा

IPL Playoffs 2024: CSK नव्हे तर RCBच जाणार प्लेऑफमध्ये! ही आकडेवारी पाहून खात्री पटेल

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेची हवी तशी सुरुवात न करु शकणाऱ्या रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाने गेल्या ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या विजयांसह या संघाने प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दावा केला आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स संघाचा दोनदा पराभव केला.

यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने या हंगामात सलग सर्वाधित सामने जिंकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दरम्यान यापूर्वी २०११ मध्ये झालेल्या स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सलग ७ सामने जिंकले होते. त्यावेळी या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २०१६ मध्ये झालेल्या हंगामातील सलग ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळीही या संघाने फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. यावेळीही या संघाने सलग ५ सामने जिंकले आहेत. २०१० मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात या संघाने सलग ४ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या हंगामातही या संघाने सलग ४ सामने जिंकून प्लेऑफचं तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ही आकडेवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या फॅन्सला दिलासा देणारी आहे. मात्र यावेळी प्लेऑफ गाठण्याचा मार्ग इतका सोपा नसणार आहे.

कसं आहे समीकरण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टीकून आहे. तर या संघाचा पुढील सामना येत्या १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. यासह या संघाला इतर संघांच्या निकालावर देखील अवलंबून राहावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT