RCB team Saam tv
Sports

WPL 2023: सलग ५ सामने गमावूनही RCB करणार प्लेऑफमध्ये प्रवेश! समजून घ्या समीकरण

Rcb womens cricket team: केवळ १ सामना जिंकलेल्या आरसीबी संघाला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

Ankush Dhavre

wpl points table: विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिलाच हंगाम यशस्वी होताना दिसून येत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. आता मुंबईच्या महिलांचा संघ देखील या विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

तर केवळ १ सामना जिंकलेल्या आरसीबी संघाला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

आयपीएल स्पर्धेत टॉप ४ संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळत असते. मात्र विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं समीकरण वेगळं आहे. पहिल्या स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. (Latest sports updates)

तर दुसऱ्या आणि तिसरी स्थानी असलेल्या संघाला एलिमीनेटरचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.

आरसीबीला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी..

आरसीबी संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी केवळ १ सामन्यात आरसीबी संघाला विजय मिळवता आला आहे.

२ गुणांसह आरसीबी संघ चौथ्या स्थानी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या मुंबई आणि दिल्ली संघाने जर आपल्या उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्याचा फायदा आरसीबी संघाला होणार आहे. कारण गुजरात आणि युपीचा पराभव होईल.

जर आरसीबीने आपले उर्वरित सामने जिंकले, तर त्यांचे एकूण ६ गुण होतील. तर गुजरातने युपी विरुध्द होणाऱ्या सामन्यात मिळवला पाहिजे यासाठी आरसीबी संघाला प्रार्थना करावी लागणारं आहे. असे झाल्यास आरसीबी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

Dum Aloo: घरच्या घरी पाहुण्यांसाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT