RCB Can still qualify in ipl 2024 playoffs know the scenario amd2000 twitter
Sports

RCB Playoffs: RCB फॅन्ससाठी गुड न्यूज! तळाला असलेल्या बेंगळुरूला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी; समीकरण पाहा

RCB Playoffs Scenario: फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. मात्र या संघाला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.

Ankush Dhavre

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला केवळ एका धावेने गमावला आहे.

या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जवळजवळ मालवल्या आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र या संघाने निर्णायक सामना गमावला आहे. ७ सामने गमावल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. कसं असेल समीकरण ? जाणून घ्या.

असं असेल समीकरण..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने ८ सामने खेळेले असून ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाला केवळ पंजाब किंग्ज संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. दरम्यान पराभवाच्या षटकारासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला इथून पुढे ६ सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने जिंकल तरी हा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. मात्र संघांच्या तुलनेत १४ गुण कमी पडतील. मात्र क्रिकेटमध्ये केव्हाही काहीही होऊ शकतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अजूनही अधिकृतरित्या या स्पर्धेतून बाहेर झालेला नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला इथून पुढील सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनंतर ५ मिनिट ३९ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल, AI की MMS खरा?

धक्कादायक! बापाने ५ मुलांसोबत गळफास घेतला, ३ मुलींसह चौघांचा मृत्यू,२ मुलांनी जीव वाचवून पळ काढला

Cancer Test: या ४ टेस्ट शोधून काढतील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी; वेळेत निदान होणं गरजेचं

Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार

Upvasachi Idli Recipe: उपवासाला साबुदाण्याची मऊ, लुसलुशीत इडली कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT