Harshal patel and riyan parag argument google
Sports

IPL 2022 : शेवटच्या चेंडूवर ठोकला षटकार; रियान-हर्षलमध्ये झाला तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) एकाहून एक रंगदार लढत पाहायला मिळत आहेत. फलंदाज षटकारांची आतषबाजी करतच आहेत, पण गोलंदाजही चमकदार कामगिरी करण्यासाठी कंबर कसत आहेत. तसंच मैदानात सामना अतीतटीचा झाल्यास फलंदाज आणि गोलंदाज आमने सामने येऊन एकमेकांना भिडल्याचंही प्रेक्षकांनी अनेकदा पाहिलं आहे. दरम्यान, मंगळवारी पुण्याच्या एमसीए मैदानात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरमध्ये (RCB) रंगतदार लढत झाली. त्यावेळी आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) आणि राजस्थानचा फलंदाज रियान पराग (Riyan Parag) यांच्यात वादाची ठिणगी पेटली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत आरसीबीसमोर १४४ धावांचा आव्हान ठेवलं. रियान परागने मोक्याची वेळी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यावर मैदानावर हर्षल पटेल आणि रियान परागमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर इतर खेळाडूंनी हर्षल आणि रियानला शांत करण्याचा प्रयत्न केला.

शेवटच्या षटकात रियान परागची फटकेबाजी

राजस्थानचे धावफलक रोखण्यासाठी आरसीबीकडून हर्षल पटेलने शेवटच्या षटकात गोलंदाजी केली. परंतु, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलचा रियान परागने दोन षटकार ठोकत धुव्वा उडवला. त्यामुळे राजस्थानची धावसंख्या आणखी १८ धावांनी वाढली. रियानने हर्षलच्या गोलंदाजीत दोन षटकार, एक चौकार मारले तसंच दोन धावाही काढल्या. शेवटच्या चेंडूवर रियानने षटकार ठोकल्याने हर्षल चिडला आणि दोघांमध्ये वाद झाला. रियानने या सामन्यात ३१ चेंडूत ५६ धावा कुटल्या. यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.

मंगळवारी झालेल्या राजस्थना रॉयल्स आणि बंगळुरुच्या सामन्यातही १४५ धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर विराटने अवघ्या ९ धावाच केल्या. तसंच बंगळुरु संघाच्या सर्वच फलंदाजांनी राजस्थान समोर नांगी टाकल्याने २९ धावांनी आरसीबीचा पराभव झाला. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा विराट कोहली सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानाता उतरला होता. परंतु, विराटने १० चेंडूत ९ धावा केल्याने बंगळुरुचा हा प्रयोगही सपशेल अपयशी ठरला. कोहलीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ९ सामने खेळले असून १२८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत

कारला धडक दिल्याने अभिनेत्रीची सटकली, फटाके फेकत भररस्त्यात राडा; म्हणाली- 'माझी दिवाळी...', VIDEO व्हायरल

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT