RCB VS RR  Twitter
Sports

RCB VS RR Match Result: चिन्नास्वामीच्या मैदानावर RCB ठरले 'रॉयल',राजस्थानवर मिळवला ७ धावांनी विजय

RCB VS RR Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवण्यासाठी १९० धावांची गरज होती. मात्र राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८२ धावा करता आल्या आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केल्या १८९ धावा..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १८९ धावा केल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला होता. त्यानंतर फाफ डू प्लेसिसने संघाचा भार सांभाळला. त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि २ षटकाराच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी केली होती.

तर ग्लेन मॅक्सवेलने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १८९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय

या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने ४७ धावांची खेळी केली होती. तर देवदत्त पडीक्कलने ३४ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ७ चौकार आणि १ षटकार मारला. शेवटी हेटमायर कडून मोट्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवीन देऊ शकला नाही. शेवटी जुरेलने तुफान फटकेबाजी केली. मात्र राजस्थानचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावांनी दुर राहिला.

या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

राजस्थान रॉयल्स:

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT