Ravindra jadeja
Ravindra jadeja Saam Tv
क्रीडा | IPL

IND Vs AUS: रवींद्र जडेजा कसोटीत रचणार इतिहास! हा मोठा विक्रम नावावर करत वर्ल्ड क्रिकेटला हादरवून सोडणार

Ankush Dhavre

ICC Ranking: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे.

आता उर्वरित कसोटी सामने इंदोर आणि अहमदाबादच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. (Latest Sports Updates)

आज आयसीसीची रॅकिंग जाहीर केली जाणार आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) आपलाच एक मोठा विक्रम मोडून काढू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी करणारा रवींद्र जडेजा सध्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याची कामगिरी पाहता हे तर नक्की आहे की, तो नंबर १ स्थानी कायम राहणार आहे.

जडेजाचे रेटिंग पॉईंट्स ४२४ आहेत. या दमदार कामगिरीचा त्याला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रँकिंगमध्ये तो मोठी उसळी घेऊ शकतो. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम रेटिंग ४३८ आहे. यावेळी तो स्वतःचाच रेकॉर्ड मोडत आणखी मोठा रेकॉर्ड प्रस्थापित करू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरू असलेल्या मालिकेत त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीची जादू पाहायला मिळत आहे. या मालिकेतील २ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण १७ गडी बाद केले आहेत. नागपुर कसोटीत त्याने ७ तर दिल्ली कसोटीत त्याने १० गडी बाद केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Local Bodies Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

Chhatrapati Sambhajinagar: घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग! २१ वर्षानंतर शहरातील होर्डिंगसह इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Today's Marathi News Live : पुण्यातील धोकादायक होर्डिंग काढून टाका, महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

Yavatmal News: मित्रानेच केला घात! पती ड्युटीवर जाताच पत्नीवर लैगिंक अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Petrol Diesel Rate (16th May 2024): महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वधारले की घसरले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT