ravindra jadeja saam tv
Sports

IND vs WI: वनडे मालिकेत रविंद्र जडेजा रचणार इतिहास! कपिल देवचा 'हा' मोठा विक्रम मोडण्याची संधी

Ravindra Jadeja Records: या मालिकेत अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे

Ankush Dhavre

Most Wickets Against West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला पोहोचला आहे. १२ जुलैपासुन २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

तर २७ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

जडेजाच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद..

वनडे मालिकेत रविंद्र जडेजाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते. या मालिकेत ३ गडी बाद करताच तो भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना वनडेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज बनणार आहे. यासह तो माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडून काढणार आहे.

कपिल देवचा रेकॉर्ड मोडणार..

वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा कपिल देव यांच्या नावे आहे. त्यांनी ४२ सामन्यांमध्ये ४३ गडी बाद केले आहेत. तर रविंद्र जडेजाने अवघ्या २९ सामन्यांमध्ये ४१ गडी बाद केले आहेत. तर माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी २६ सामन्यांमध्ये ४१ आणि मोहम्मद शमीने १८ सामन्यांमध्ये त्याने ३७ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

भारत -वेस्ट इंडिज रेकॉर्ड...

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचा जर रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघ आतापर्यंत १३६ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात भारतीय संघाने ६७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजला ६३ सामने जिंकण्यात यश आले आहे. तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT