ravindra jadeja twitter
Sports

IND vs NZ: विश्वासच बसेना..! जडेजाने सोपा झेल सोडल्यानंतर बायकोला आश्चर्याचा धक्का; दिलेली रिॲक्शन होतेय व्हायरल, Video

Ravindra Jadeja's Wife Reaction: जडेजाच्या बायकोने दिलेली रिॲक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja's Wife Reaction:

रविंद्र जडेजा हा केवळ भारतीय संघातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने एकापेक्षा एक भन्नाट झेल टिपले आहेत. मात्र जडेजाने सोपा झेल सोडलाय यावर तुमचा विश्वास बसेल का? मात्र हे खरं आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याने हाताखालचा झेल सोडला आहे. दरम्यान हा झेल सोडल्यानंतर रविंद्र जडेजाच्या पत्नीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

तर झाले असे की,न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना ११ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर रचिन रविंद्रने स्क्वेअर कट मारला. हा चेंडू सरळ पॉइंटला असलेल्या जडेजाच्या हातात गेला.

जडेजा सहसा झेल सोडत नाही. मात्र हा चेंडू त्याच्या हातून निसटला. दरम्यान हा झेल सुटल्यानंतर त्याची पत्नी रिवाबाला देखील आश्चर्याचा धक्का बसला. तिने दिलेल्या रिअॅक्शनचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात टिपला होता भन्नाट झेल..

भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाकडून रविंद्र जडेजाने भन्नाट झेल टिपला होता. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना रविंद्र जडेजा पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होता.

त्यावेळी मुश्फिकुर रहीमने पॉइंटच्या दिशेने शॉट मारताच जडेजाने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. या झेलच्या बळावर त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचं मेडल देण्यात आलं होतं.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी सूर्युकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. तर शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT