Ravindra Jadeja Saam Tv
Sports

Ravindra Jadeja:'हे' केवळ सर जडेजाला जमलंय! ७ गडी बाद करताच जडेजाने रचला इतिहास

स्ट्रेलिया संघाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू असताना ७ गडी बाद केले आहेत

Saam TV News

IND VS AUS Ravindra Jadeja: बॉर्डर - गावसकर ट्रॉफितील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघाची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरू असताना ७ गडी बाद केले आहेत.

ज्यामध्ये ५ फलंदाजांना त्याने क्लीन बोल्ड करत माघारी धाडले आहे. यासह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १२.१ षटक गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले. यासह त्याने सर्वात कमी षटकांमध्ये ७ गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Latest Sports Updates)

यापूर्वी हा विक्रम आर अश्विनच्या नावे होता. अश्विनने २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुध्द खेळताना १३.५ षटकांमध्ये ७ पेक्षा अधिक गडी बाद केले होते. तर नरेंद्र हिरवानी यांनी १५.२ षटकांमध्ये ७ गडी बाद केले होते.

कसोटी क्रिकेटमधील जडे जाची सर्वोत्तम कामगिरी...

डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने १२.१ षटक गोलंदाजी करत अवघ्या ४२ धावा खर्च केल्या आणि ७ गडी बाद केले.

ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानावर ४८ धावा खर्च करत ७ गडी बाद केले होते.

रवींद्र जडेजाने दिल्ली कसोटीतील दुसऱ्या डावातील सुरुवातीच्या ७ षटकांमध्ये केवळ १ गडी बाद केला होता. त्यानंतर उर्वरित ५.१ षटकांमध्ये त्याने ६ धावा खर्च करत ६ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT