Ravi Shastri saam tv news
Sports

Ravi Shastri: रवी शास्त्री होणार इंग्लंडचे हेड कोच? ऑफर मिळताच शास्त्री गुरुजींची भन्नाट प्रतिक्रिया; पाहा Video

Ravi Shastri Viral Video: रवी शास्त्री यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Ravi Shastri On England Head Coach Offer:

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक इंग्लंडला प्रशिक्षण देणार? असा प्रश्न इंग्लंड विरुद्ध नेदरलँड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान उपस्थित करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रवी शास्त्री यांना मोठी ऑफर देण्यात आली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंडने गतविजेते म्हणून एन्ट्री केली होती. मात्र त्यांना तसा खेळ करता आलेला नाही. इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर याच सुमार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतूनही बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे.

ओएन मॉर्गनने दिली ऑफर..

तर झाले असे की, इंग्लंड विरुद्ध नेदरलँड सामना पाहण्यासाठी इंग्लंडचे काही प्रेक्षक पुण्याच्या गहुंजे स्टेडियमममध्ये दाखल झाले होते. त्यावेळी कॅमेरामॅनची नजर एका पोस्टरवर पडली. ज्यावर लिहीलं होतं की, 'इंग्लंडला भारतीय प्रशिक्षकाची गरज आहे..' यावर चर्चा करत असताना ओएन मॉर्गनने रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक बनण्याबाबत प्रश्न विचारला. यावर रवी शास्त्री यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. (Latest sports updates)

रवी शास्त्री यांनी हिंदी भाषेत उत्तर देत म्हटले की,'हो येईल ना हिंदी शिकवायला.. ' हे ओएन मॉर्गनला कळालं नाही. त्यानंतर त्यांनी इंग्रजीत उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की,हो मला सर्वांना इंग्रजी शिकवायला आवडेल.. सोबत क्रिकेटच्या टिप्सही देईल.'हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT