ravi shastri in favour of impact player rule rohit sharma jasprit bumrah against the rule amd2000 saam tv news
Sports

Ravi Shastri: 'इम्पॅक्ट प्लेअर'नियम असलाच पाहिजे! रोहित,बुमराहचा विरोध पण रवी शास्त्रींचा फुल सपोर्ट

Ravi Shastri On Impact Player Rule: रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी या नियमाचा विरोध केला होता. मात्र रवी शास्त्रींनी या नियमाचं समर्थन केलं आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२३ स्पर्धेपासून इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागु करण्यात आला आहे. हा नियम लागु केल्यापासून सर्व संघांना अतिरिक्त फलंदाजाला संघात खेळवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे या स्पर्धेत हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२४ स्पर्धेत तर फलंदाजीतील सर्वच रेकॉर्ड मोडले गेले आहेत.

या हंगामात अनेकदा २४०-२५० पेक्षा अधिकची धावसंख्या उभारली गेली आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं अस्तित्व संपुष्टात येत आहे, असं म्हणत रोहित शर्माने या नियमाचा विरोध केला होता.

इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर पहिल्यांदा २०२२ मध्ये झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केला गेला होता. या नियमानुसार सर्व संघांना आपला १२ वा खेळाडू खेळवण्याची मुभा दिली जाते. संघ गरजेनुसार फलंदाज किंवा गोलंदाजाचा प्लेऑफमध्ये समावेश करु शकतात. नाणेफेकीच्या वेळी संघाच्या कर्णधारा इम्पॅक्ट प्लेअर्सची यादी द्यावी लागते. त्यानंतर सामन्यावेळी संघ प्लेइंग ११ मधून कुठल्याही एका खेळाडूला बाहेर करुन इम्पॅक्ट प्लेअरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करु शकतात. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या नियमाच्या विरोधात आहे. मात्र माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्री या नियमाचं समर्थन करताना दिसून आले आहेत.

काय म्हणाले रवी शास्त्री?

भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ' इम्पॅक्ट प्लेअरचा नियम चांगला आहे. तुम्हाला वेळेनुसार पुढे जावं लागेल. असं इतर खेळाडूंमध्येही पाहायला मिळतं. या नियमामुळे अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. तुम्हीच पाहा, गेल्या हंगामात थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. या नियमामुळे खरंच खूप फरक पडला आहे. जेव्हा नवीन नियम येतो, त्यावेळी काही लोकं नियमाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही १९०-२०० धावा सातत्याने पाहत आहात आणि आता लोकांना संधी मिळतात, तेव्हा तुम्हाला नियमांचा विचार करायला भाग पाडले जाते.'

या नियमाबाबत बोलताना जय शाह म्हणाले होते की, ' या नियमामुळे २ अतिरिक्त भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत आहे. सामने आणखी रोमांचक होत आहेत. हा नियम चाचणी म्हणून लागु करण्यात आला होता. जर खेळाडू आणि फ्रेचांयझींना काही वाटत असेल, तर नक्कीच आम्ही याबाबत विचार करु. मात्र आमच्यापर्यंत अजून तरी काही आलेलं नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला बेवारस मृतदेह

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT