rashid khan viral video twitter
क्रीडा

AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर राशिद खानचे डोळे पाणावले! भावुक करणारा VIDEO व्हायरल

Rashid Khan Emotional Video: अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली आणि सेमिफायनलमध्ये प्रवेश केला.

Ankush Dhavre

राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. हा सामना जिंकून अफगाणिस्तानने स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यातील विजयानंतर अफगाणिस्तान संघातील खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. १ -१ धाव महत्वाची असताना अफगाणिस्तान संघातील गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी जीव ओतला. शेवटच्या षटकात मुस्तफिजूर रहमानला बाद करत अफगाणिस्ताने इतिहास रचला. चेंडू फलंदाजाच्या पॅडला जाऊन लागताच नवीन उल हकने मागे वळून पाहिलंच नाही.

अंपायरने बाद घोषित करताच अफगाणिस्तानचे खेळाडू जल्लोष करु लागले. वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये पोहोचणं ही अफगाणिस्तान संघासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसह कर्णधार राशिद खानचेही डोळे पाणावले. राशिद खान मैदानाबाहेर जात असताना, डोळे पुसताना दिसून आला. या व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

अफगाणिस्तानचा जोरदार विजय

या सामन्याआधीच अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघासाठी सेमिफायनलमध्ये जाण्याचं समीकरण ठरलं होतं. अफगाणिस्तानला केवळ हा सामना जिंकायचा होता. तर बांगलादेशला दिलेलं आव्हान १३ षटकात पूर्ण करायचं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना सेमिफायनलमध्ये जाण्याची समान संधी होती.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला २० षटकअखेर ११५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १०५ धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र त्याची ही खेळी अपयशी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT