AFG vs BAN: जॉनथन ट्रॉटचा तो इशारा ते राशिद खानची फिरकी! हे आहेत अफगाणिस्तानच्या विजयाचे टर्निंग पॉईंट

Afghanistan vs Bangladesh, Turning Points: अखेर अफगाणिस्तानचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशला नमवत आयसीसी टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
AFG vs BAN: जॉनथन ट्रॉटचा तो इशारा ते राशिद खानची फिरकी! हे आहेत अफगाणिस्तानच्या विजयाचे टर्निंग पॉईंट
afghanistan cricket teamtwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानने बांगलादेशला धूळ चारत पहिल्यांदाच आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११६ धावा करायच्या होत्या.

मात्र शानदार गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव अवघ्या १०५ धावांवर रोखला आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान जाणून घ्या, या सामन्यातील टर्निंग पॉईंट.

रहमानुल्लाह गुरबाजची खेळी

या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण होतं. त्यात पाऊस येत जाता होता. त्यामुळे चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर येत नव्हता. एकीकडे फलंदाज बाद होऊन माघारी जात होते. दुसरीकडे रहमानुल्लाह गुरबाज खेळपट्टीवर टीकून होता. त्यान ५५ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ४३ धावांची खेळी केली. आणि संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली.

AFG vs BAN: जॉनथन ट्रॉटचा तो इशारा ते राशिद खानची फिरकी! हे आहेत अफगाणिस्तानच्या विजयाचे टर्निंग पॉईंट
AFG vs BAN, Highlights: अफगाणिस्तानने रचला इतिहास! बांगलादेशला लोळवत पहिल्यांदाच सेमिफायनलमध्ये प्रवेश

राशिद खानची फिरकी

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११६ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा बचाव करताना अफगाणिस्तानकडूच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. ज्यात कर्णधार राशिद खानने मोलाची भूमिका बजावली. त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात २३ धावा खर्च करत ४ गडी बाद केले.

AFG vs BAN: जॉनथन ट्रॉटचा तो इशारा ते राशिद खानची फिरकी! हे आहेत अफगाणिस्तानच्या विजयाचे टर्निंग पॉईंट
IND vs AUS,Highlights: पराभवाचा बदला घेतला! ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत टीम इंडियाची सेमिफायनलमध्ये धडक

जॉनथन ट्रॉटचा तो इशारा

या सामन्यात पावसाची ये जा सुरुच होती. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. ज्यावेळी बांगलादेशचा संघ पार स्कोअरच्या अगदी जवळ होता. त्यावेळी जॉनथन ट्रॉटने सामना स्लो करण्याचा इशारा केला. त्यावेळी बांगलादेशचा संघ केवळ २ धावांनी मागे होता. त्यानंतर पाऊस सुरु झाला. जर पाऊस येण्यापूर्वी बांगलादेशचा संघ पार स्कोअरच्या पुढे गेला असता आणि पावसामुळे सामना रद्द झाला असता, तर अफगाणिस्तानला हा सामना गमवावा लागला असता. ट्रॉटच्या इशाऱ्यानंतर मासपेशी खेचले गेल्यामुळे गुलबदीन नईम ग्राऊंडवर झोपला. त्यामुळेही सामना काही मिनिटं थांबला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com