ranji trophy twitter
Sports

Ranji Trophy: हाय व्होल्टेज ड्रामा! फक्त २ धावांमुळे गुजरातचा पॅकअप; केरळ पहिल्यांदाच खेळणार रणजी ट्रॉफी फायनल - VIDEO

Kerala vs Gujarat, Ranji Trophy Semi Final: रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये केरळ आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात केरळने बाजी मारली आहे.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये गुजरात आणि केरळ हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यातील पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाल. शेवटच्या दिवशी केरळ संघाने गुजरातला ४५५ धावांवर ऑलआऊट केलं आणि पहिल्या डावातील २ धावांच्या आघाडीसह केरळचा संघ फायनलसाठी पात्र ठरला आहे.

७४ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं...

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात केरळ संघाला रणजी ट्रॉफीची फायनल गाठता आली नव्हती. आता गुजरातला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नमवत केरळ संघाने फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. ७४ वर्षांनंतर केरळ संघाने पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. ही केरळ संघासाठी अभिमानाची बाब आहे. आता फायनल जिंकून केरळकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

पहिल्या डावात उभारला ४५७ धावांचा डोंगर

केरळचा संघ या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्या डावात केरळ संघाने ४५७ धावांचा डोंगर उभारला. केरळकडून फलंदाजी करताना मोहम्मद अझहरुद्दीनने सर्वाधिक १७७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर केरळला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याला सचिन बेबीने चांगली साथ दिली. सचिनने ६९ धावांची खेळी केली. तर सलमान निजरने ५२ धावा केल्या.

गुजरातचा डाव आटोपला

केरळने केलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातलाही चांगली सुरुवात मिळाली होती. गुजरातच्या फलंदाजांनी शेवटच्या दिवसांपर्यंत झुंज दिली आणि संघाची धावसंख्या ४५५ धावांपर्यंत पोहोचवली. डावाची आघाडी घेऊन सामना जिंकण्याची नामी संधी गुजरातकडे होती. मात्र ४५७ धावा करण्यासाठी शेवटच्या २ धावा शिल्लक असताना गुजरातला मोठा धक्का बसला. यासह २ धावांची आघाडी घेऊन केरळचा संघ फायनलसाठी पात्र ठरला.

गुजरातचा संघ २ धावा दूर असताना फलंदाजाने फटका मारला होता. मात्र त्याचा फटका फसला आणि चेंडू सरळ शॉट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला जाऊन लागला. त्यावेळी स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने सोपा झेल घेतला आणि केरळने २ धावांची आघाडी घेतली. गुजरातकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना प्रियांक पांचालने सर्वाधिक १४८ धावांची खेळी केली. तर जयमीत पटेलने ७९ धावांची खेळी केली. तर आर्या देसाईने ७३ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT