Ranji trophy final 2024 Vidarbha captain Akshay Wadkar scored a century in Final saam tv news
क्रीडा

Ranji Trophy 2024 Final: घरच्या मैदानावर मुंबईकरांना घाम फोडला! रणजी फायनलमध्ये अक्षय वाडकरचं वादळी शतक

Akshay Wadkar Century in Ranji Trophy 2024: या सामन्यात मुंबईचा संघ एकतर्फी विजय मिळवणार असं वाटलं होतं. मात्र विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरने फायनलमध्ये शतकी खेळी करत, विदर्भ संघाला विजयाच्या अगदी जवळ नेलं.

Ankush Dhavre

Ranji Trophy Final 2024, Mumbai vs Vidharbha:

रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात विदर्भ संघाला विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान आहे.

मुंबईने हे आव्हान ठेवल्यानंतर असं वाटलं होतं की, या सामन्यात मुंबईचा संघ एकतर्फी विजय मिळवणार. मात्र विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरने फायनलमध्ये शतकी खेळी करत, विदर्भ संघाला विजयाच्या अगदी जवळ नेलं. (Akshay Wadkar Century)

हा सामना जिंकण्यासाठी विदर्भाला ५३८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना विदर्भाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. अवघ्या ६४ धावांवर संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर अथर्व तायडे ३२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर ध्रुव शोरे देखील २८ धावा करत माघारी परतला. करुण नायरने ७४ धावांची खेळी करत संघात मजबूत स्थितीत पोहचवलं . त्यानंतर कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आव्हानाच्या अगदी जवळ नेलं. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. (Cricket news in marathi)

शतकी खेळीनंतर पडली विकेट...

अक्षय वाडकर संघासाठी संकटमोचक ठरत होता. त्याने घरच्या मैदानावर मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. त्याने १९५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. ज्यावेळी त्याने आपलं शतक पूर्ण केलं. त्यावेळी विदर्भाला १९० धावांची गरज होती. मात्र तेव्हाच तनुश कोटीयानने त्याला बाद करत माघारी धाडलं. अक्षय वाडकरवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र तो बाद झाल्यानंतर लागोपाठ विकेट पडल्या.

तसेच या सामन्याबद्द बोलायचं झालं तर, या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईने २१८ धावा केल्या. मुंबईकडून फलंदाजी करताना शार्दुल ठाकुरने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना विदर्भाचा डाव १०५ धावांवर आटोपला. यासह मुंबईला दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळाली. मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावांचा डोंगर उभारला. यासह मुंबईने विदर्भासमोर ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: माजी महापौर मीनाक्षी शिंदे ठाणे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

Maharashtra Politics : मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा

Assembly Election: अजित पवार गटाला मोठा धक्का; अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात 'विदाऊट' तिकीट प्रवेश

Ramdas Kadam : रामदास कदम यांचा शरद पवार आणि महाआघाडीवर हल्लाबोल; पाहा Video

Saam Exclusive : कौल महाराष्ट्राचा : विधानसभा निवडणुकीतलं सर्वात पहिलं 'साम'चं सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT