बंगालचे क्रीडा मंत्री आता क्रिकेटचे मैदान गाजवणार; रणजी संघात 'एन्ट्री'  Saam TV
क्रीडा

बंगालचे क्रीडा मंत्री आता क्रिकेटचे मैदान गाजवणार; रणजी संघात 'एन्ट्री'

अभिमन्यू इसवरनला बंगालचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हा संघ ब गटात आहे. या गटात त्याच्यासोबत विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा, त्रिपुरा असे संघ आहेत.

वृत्तसंस्था

बंगालने रणजी ट्रॉफी 2022 (Ranji Trophy 2022 Schedule) साठी आपला संघ जाहीर केला आहे. 21 सदस्यीय संघात अनुभवी फलंदाज मनोज तिवारीच्या नावाचाही समावेश आहे. तिवारी हे सध्या बंगालचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आहेत. 2021 मध्ये, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या वतीने शिवपूर मतदारसंघातून बंगाल विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी भाजपच्या रथीन चक्रवर्ती यांचा पराभव केला. त्यानंतर मनोज तिवारींनी (Manoj Tiwari) राजकारणात येण्यासाठी क्रिकेटपासून (Cricket) दुरावले होते, मात्र आता ते पुन्हा परतण्याच्या तयारीत आहेत. 36 वर्षीय मनोज तिवारी बंगालचे कर्णधारही राहिले आहेत. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 17 वे वर्ष असणा आहे. मार्च 2020 मध्ये सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) फायनलमध्ये ते शेवटचा सामना खेळले होते. यानंतर ते दुखापतीमुळे उर्वरित मोसमापासून दूर राहिले होते.

अभिमन्यू इसवरनला बंगालचा कर्णधार बनवण्यात आले आहे. हा संघ ब गटात आहे. या गटात त्याच्यासोबत विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा, त्रिपुरा असे संघ आहेत. बंगालचा पहिला सामना 13 जानेवारीपासून बेंगळुरूमध्ये त्रिपुरासोबत होणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी कोरोनामुळे बंगालच्या तयारीवर परिणाम झाला आहे. संघातील सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबतच संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही या मोहिमेत आहेत. या सर्व चाचणीचे निकाल 2 जानेवारी रोजी आले. तेव्हापासून सर्वजण विलगीकरणात आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये सुदीप चॅटर्जी, अनुष्टुप मजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी आणि प्रदीप्ता प्रामाणिक यांचा समावेश आहे. हे सर्वजण बंगालच्या 21 जणांच्या रणजी संघाचाही भाग आहेत.

बंगालमध्ये स्थानिक स्पर्धा थांबल्या

रणजी मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी बंगाल ६-७ जानेवारीला मुंबईविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मुंबईचा संघ पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या सामन्यानंतर बंगालचा संघ बेंगळुरूला रवाना होणार आहे. अरुण लाल हे बंगालचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने कोरोना प्रकरणांमुळे सर्व स्थानिक स्पर्धा थांबवल्या आहेत. तसेच, कोविड-19 च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

बंगालचा संघ पुढीलप्रमाणे-

अभिमन्य इसवरन (कर्णधार), मनोज तिवारी, सुदीप चॅटर्जी, अनुष्टुप मजुमदार, अभिषेक रमण, सुदीर घरामी, अभिषेक दास, हृतिक चॅटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, अभिषेक पोरेल, शाहबाज अहमद, सायन शेखर, दीपेश कुमार मंडल, पो. काझी जुनैद सैफी, साकीर हबीब गांधी, प्रदीप्ता प्रामाणिक, गीत पुरी, नीलकंता दास आणि करण लाल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT