रणजी ट्रॉफी प्लेट लीग स्पर्धेतील सामना अरुणाचल प्रदेश आणि गोवा या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात गोवाचा संघ आघाडीवर आहे. याचं क्रेडीट अर्जून तेंडुलकरलाही जातं. गेल्या काही वर्षांपासून अर्जून तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय.
या संघाकडून त्याला पदार्पण करण्याची संधीही मिळाली. मात्र आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान ऑक्शन तोंडावर असताना अर्जूनने शानदार गोलंदाजी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अरुणाचल प्रदेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, अरुणाचल प्रदेशचा डाव अवघ्या ८४ धावांवर आटोपला. या डावात अर्जुनने गोलंदाजी करताना ९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने अवघ्या २५ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. तर मोहित रेडकरने ३ आणि किथ पिंटोने २ गडी बाद केले.
गोलंदाजीत शानदार कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनीही संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिला दिवसाच्या समाप्तीपर्यंत गोवाने २ गडी बाद ४१४ धावा केल्या आहेत. गोवाकडून फलंदाजी करताना कश्यप बाकलेने १७९ तर स्नेहलने १४७ धावा केल्या आहेत.
या सामन्यावर गोव्याने आपली पकड मजबूत केली आहे. १२१ धावांवर गोवाने दुसरा विकेट गमावला होता. त्यानंतर गोवाने विकेट गमावलेला नाही. यापूर्वी सिक्कीमविरुद्ध झालेल्या सामन्यातही अर्जुनच्या शानदार गोलंदाजीची झलक पाहायला मिळाली होती. त्याने ६ गडी बाद केले होते. यासह नागालँडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ४२ धावांची खेळी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.