mumbai twitter
Sports

Ranji Trophy: शार्दुल ठरला मॅचविनर! रहाणेही चमकला; हरियाणाला धूळ चारत मुंबईची सेमीफायनलमध्ये धडक

Mumbai vs Haryana Quarter Final Match: अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने शानदार खेळी करत मुंबईला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघही ठरला आहे. गतविजेत्या मुंबई संघाने उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाला १५३ धावांनी धूळ चारत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात भारतीय संघाबाहेर असलेला शार्दुल ठाकूर चमकला. शार्दुलने शानदार गोलंदाजी करुन हरियाणाच्या फलंदाजांची पळता भूई थोडी केली. तर फलंदाजीत अजिंक्य रहाणेही शानदार शतकी खेळी केली.

मुंबईने दोन्ही डावात फलंदाजी करताना ३०० पेक्षा अधिक धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ३१५ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ३३९ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने हा सामना जिंकण्यासाठी हरिायाणासमोर ३५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाचा डाव २०१ धावांवर आटोपला.

मुंबईकडून गोलंदाजी करताना रॉयस्टन डायसने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६ गडी बाद केले. शार्दुलने दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले. यासह त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले.

मुंबईने उभारली मोठी धावसंख्या

या सामन्यातील पहिल्या डावात अजिंक्य रहाणेला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नव्हता. पहिल्या डावात त्याला ३१ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने १०८ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने ७० धावांची खेळी केली. शिवम दुबेने ४८ धावांची खेळी केली. या शानदार खेळीच्या बळावर मुंबईने ३३९ धावांचा डोंगर उभारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT