arjun tendulkar twitter
क्रीडा

Arjun Tendulkar: W,W,W,W,W,W,...रणजी ट्रॉफीत अर्जुनचा कहर

Ankush Dhavre

Arjun Tendulkar, Goa vs Sikkim: भारतात सध्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत देशातील स्टार खेळाडू मैदानात उतरले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या स्पर्धेत गोवा संघाचं प्रतिनिधित्व करतोय.

या स्पर्धेतील प्लेट ग्रुपमधील दुसऱ्या फेरीतील सामन्यात गोवा संघाने सिक्कीमला धूळ चारत ५३ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजीत त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे.

गोलंदाजीत अर्जुनचा जलवा

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जुनला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली.

या संधीचं सोनं करत त्याने दोन्ही डावात मिळून ६ गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने १४ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ५ निर्धाव षटक टाकत ३१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने २० षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ८१ धावा खर्च केल्या आणि सिक्कीमच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं.

अर्जुन तेंडुलकर २०२२ पासून आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. २०२३ मध्ये त्याला या संघाकडून पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. गेल्या हंगामातही त्याला १ सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ४८१ धावा केल्या आहेत. येत्या काही दिवसांत आयपीएल मेगा ऑक्शन होणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स त्याला पुन्हा आपल्या संघात घेणार का? की दुसरा कुठला संघ त्याच्यावर बोली लावणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Latest News : ठाकरे गट आणि कॉंग्रेसचे स्वबळाचे वारे, महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीत शरद पवारांची मध्यस्थीची भूमिका

Nandurbar Rain : परतीच्या पावसाने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी; पांढर सोनं झालं मातीमोल!

भारतात एकूण किती रेल्वे स्टेशन्स आहेत? पाहा एका क्लिकवर

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम! Mechathlon 2024 मुंबई एडिशनमध्ये रोबोटिक्सचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT