Cricket News: रणजी करंडक दोन टप्प्यांत खेळवणार? -Saam Tv
Sports

Cricket News: रणजी करंडक दोन टप्प्यांत खेळवणार?

भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आणि त्यामुळे जानेवारी महिन्यापासून खेळवण्यात येणारी रणजी करंडक ही स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली, पण आता देशातील बहुतांश राज्य संघटनांच्या विनंतीनुसार रणजी करंडक खेळवण्याचा विचार बीसीसीआयकडून करण्यात येत आहे

Amit Golwalkar

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आणि त्यामुळे जानेवारी महिन्यापासून खेळवण्यात येणारी रणजी करंडक ही स्पर्धा अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली, पण आता देशातील बहुतांश राज्य संघटनांच्या विनंतीनुसार रणजी करंडक खेळवण्याचा विचार बीसीसीआयकडून करण्यात येत आहे. (Ranaji Trophy will be played in two phases)

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्या उपस्थितीत गुरुवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये रणजी करंडक (Ranji Trophy Cricket) दोन टप्प्यांत खेळवण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रणजी करंडकाला १३ जानेवारीपासून सुरुवात होणार होती, पण त्याचप्रसंगी देशात कोरोनाची (Corona) तिसरी सुरू झाली. त्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली.

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात येईल अशी चिन्हे निर्माण झाली, पण राज्य संघटनांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडे विनंती केली. त्यामुळे आता हा करंडक दोन टप्प्यांत खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आयपीएलनंतर उर्वरित स्पर्धा

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल या वेळी म्हणाले, रणजी करंडक खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान साखळी फेरीच्या लढती आयोजित करता येतील का, याबाबत विचार सुरू आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा पार पडेल. जून-जुलै महिन्यात रणजीचा उर्वरित टप्पा खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे अरुण धुमल या वेळी म्हणाले; मात्र जून-जुलै महिन्यात भारतातील विविध ठिकाणी असलेले वातावरण (पाऊस) तसेच खेळाडूंची उपलब्धता यासह इतर बाबींवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे असेही ते पुढे म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT