rajat patidar twitter
Sports

Rajat Patidar: अनलकी पाटीदार! अर्धशतकाच्या जवळ असताना अशा पद्धतीने झाला बाद

Rajat Patidar Wicket: रजत पाटीदार आपल्या पहिल्याच सामन्यात स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Rajat Patidar Wicket Video:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जयस्वालच्या झुंजार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. तर दुसरीकडे रजत पाटीदार आपल्या पहिल्याच सामन्यात स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.

अनलकी पाटीदार..

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराटने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. विराटने माघार घेतल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून रजत पाटीदारला भारतीय संघात स्थान दिलं गेलं. मात्र पहिल्या कसोटीत त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या कसोटीतून केएल राहुल बाहेर झाल्यानंतर रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र या संधीचा त्याला फायदा घेता आलेला नाही. (Cricket news in marathi)

या सामन्यातील पहिल्या डावात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी यशस्वी जयस्वाल आक्रमक फलंदाजी करत होता. पहिलाच सामना खेळत असलेल्या रजत पाटीदारने सावध पावित्रा घेत ७२ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची खेळी केली. तो कासव गतीने पुढे जात होता. मात्र अर्धशतक झळकावण्याची सुवर्णसंधी असताना त्याचं नशीब फुटकं निघालं.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि एक टप्पा घेत यष्टीला जाऊन धडकला. त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीला जाऊन धडकलाच. आपल्या या छोट्याश्या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार मारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry Funny Video: 'आज मी या महिलेला रस्त्यावर पैसे मागताना...'; उर्वशी रौतेलासोबत मजा करताना दिसला ओरी, VIDEO व्हायरल

Nashik Ring Road : नाशिकमधील वाहतूककोंडीची कटकट संपणार, ६६ किमीचा रिंग रोड, ८,००० कोटींचा प्रोजेक्ट कसा असेल?

Maharashtra Live News Update : छावा संघटनेचे विजय घाडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Makyachi Bhakri Tips: मक्याची भाकरी जमतच नाही? थापताना तुटते, फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, मऊ भाकरीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT