RR vs LSG Match Saam tv
क्रीडा

RR vs LSG Match : केएल राहुल आणि पुरनची झुंजार खेळी व्यर्थ; राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय

Vishal Gangurde

RR vs LSG IPL Match :

जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियममध्ये राजस्थान आणि लखनऊ सुपर जाएंट्समध्ये रोमांचक सामना झाला. सामन्यातील शेवटच्या षटकापर्यंत चुरस कायम राहिलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सला धूळ चारली. १९४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊला राजस्थानने १७३ धावांत गुंडाळलं. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात केएल राहुल आणि पुरनची खेळी व्यर्थ ठरली. राजस्थान रॉयल्सने अवघ्या २० धावांनी सामना जिंकला. (latest Marathi News)

राजस्थान रॉयल्सने १७ व्या हंगामात विजयी सलामी दिली. राजस्थानकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ८२ धावा ठोकल्या. तर रियाग परागने ४३ धावा ठोकल्या. दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने १७३ धावा कुटल्या. (IPL Match)

राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने २० षटकात ६ गडी गमावून फक्त १७३ धावा केल्या. यामुळे लखनऊला २० धावांनी सामना गमावला. लखनऊसाठी निकोलस पुरनने सर्वाधिक ६४ धावा केल्या. तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने ५८ धावा कुटल्या. या सामन्यात क्विंटन डिकॉक आणि मार्कस स्टोइनिस यांनी फारशी चांगली कामगिरी दाखवली नाही. देवदत्त पडिक्कल हा शून्य धावांवर बाद झाला.

पुरनची खेळी व्यर्थ

लखनऊच्या निकोलस पुरनवर संघाच्या विजयाची जबाबदारी होती. मात्र, पुरन अयशस्वी ठरला. आजच्या सामन्यात पुररने चार चौकार आणि चार षटकार लगावले. पुरनने ४१ चेंडूत नाबाद ६४ धावा चोपल्या. तर राजस्थान रॉयल्सचा जलद गोलंदाज संदीप शर्मा आणि आवेश खान या दोघांनी डेथ ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली.

संजू सॅमसन चमकला

या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीची सुरुवात चांगली राहिली नाही. राजस्थानने पॉवरप्लेमध्येच दोन गडी गमावले. पहिली विकेट जोस बटलरचा गेला, त्यानंतर नवीन उल हक बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वालही स्वस्तात माघारी परतला. संघाची धावसंख्या झाल्यानंतर उतरलेल्या संजू सॅमसमनने संघाची कमान सांभाळली. संजू आणि रियानने दोघांनी मिळून ९३ धावांची भागीदारी रचली. दोघांच्या खेळीमुळे संघांची धावसंख्या १९३ पर्यंत पोहोचली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT