आयपीएल स्पर्धेतील रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव केला आहे. आयपीएल स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात जोस बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सामना २ गडी राखून जिंकला. राजस्थानला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर बटलरने चौकार मारला आणि सामना जिंकला.
धावांचा पाठलाग करत असताना राजस्थान रॉयल्स संघाने १८ आणि १९ व्या षटकात तुफान फटकेबाजी केली. स्ट्राइकवर असलेल्या जोस बटलरने मिचेल स्टार्क आणि हर्षित राणाच्या षटकात चांगलाच हल्लाबोल केला. १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षित राणाच्या षटकात बटलरने १९ धावा कुटल्या. या षटकात त्याने २ षटकार खेचले.
शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्स संघाला ९ धावांची गरज होती. जोस बटलर ९८ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करण्यासाठी आला. या शतकातील पहिल्याच चेंडूवर जोस बटलरने षटकार मारला. आता जिंकण्यासाठी केवळ ३ धावांची गरज होती. त्यानंतर त्याने सलग ३ डॉट चेंडू टाकले. पाचव्या चेंडूवर बटलरने शॉट मारला आणि २ धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर राजस्थानला जिंकण्यासाठी १ धावेची गरज होती. बटलरने चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी पाठलाग ठरला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर २२३ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सुनील नरेनने शतकी खेळी केली. त्याने ५६ चेंडूत १०९ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि ६ षटकार मारले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अंगक्रिश रघुवंशीने १८ चेंडूत ३० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ गडी राखून सामना जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.