IPl 2024 RR vs MI 
क्रीडा

IPl 2024 RR vs MI: जयस्वालची 'यशस्वी' खेळी; शतक ठोकत मुंबईला नमवलं

Rajasthan Royals vs Mumbai Indians : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा विजय मिळवलाय. जयस्वालच्या शतकीय खेळीने मुंबईच्या संघाचा दारूण पराभव केला.

Bharat Jadhav

Rajasthan Royals vs Mumbai Indians: राजस्थानच्या संघाने ९ विकेट राखत मु्ंबईचा दारूण पराभव केला. मुंबईने दिलेल्या १८० धावांचे आव्हान जयस्वालच्या यशस्वी खेळीने पार केलं. या विजयासह राजस्थानने ७ सामन्यात विजय मिळवत पॉइंट्स टेबलच्या अव्वलस्थानी कायम राहिलाय.

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईच्या सलामीवीर फलंदाजांना नेहमी सारखी आक्रमक फलंदाजी करू दिली नाही. सुरुवातीला कमी धावसंख्येत तीन विकेट गमावल्यानंतर मुंबईचा संघा दबावात खेळत होता. त्यावेळी वढेरा आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरत मुंबईला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. तिलक वर्माने ५० धावा केल्या तर वढेराचं एका धावेवरून अर्धशतक हुकलं. राजस्थानकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने ५ विकेट घेतल्या.

यशस्वी जयस्वालने १०४ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यात त्याला जॉस बटलर, कर्णधार संजू सॅमसनची साथ मिळाली. यशस्वीने ६० चेंडूत १०४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. तस संजू सॅमसनने २८ चेंडूत ३८ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. जॉस बटलरने २५ चेंडूत ३५ धावा केल्या.

मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून १७९ धावा केल्या. हे आव्हान राजस्थानने १८.४ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात पार केलं. आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी फटकेबाजी करत मुंबईला पहिल्या षटकापासून दबावात ठेवलं.

राजस्थान संघाच्या ६ षटकात ६१ धावा झाल्या असताना पावसाने हजेरी लावली. काहीवेळानंतर सामना परत सुरू झाला तेव्हा राजस्थानच्या खेळाला अजून गती मिळाली. दरम्यान आठव्या षटकात मुंबईला पहिली विकेट बटलरच्या रुपात मिळाली. पीयुष चावलाने त्याचा त्रिफळा उडवत आपल्या खात्यावर एक विकेट जमा केली. परंतु राजस्थान तोपर्यंत विजयाच्या जवळ पोहोचला होता. यशस्वी जयस्वालने १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT