IPl 2024 Rajasthan Royals vs Mumbai Indians x ipl
Sports

IPl 2024 RR vs MI: वढेरा-तिलकने सावरला MIचा डाव;राजस्थानसमोर १८० धावांचे आव्हान

IPl 2024 RR vs MI: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होत आहे.

Bharat Jadhav

Rajasthan Royals vs Mumbai Indians: आयपीएलचा ३८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघाची भिडत होत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १७९ धावा करत राजस्थानसमोर १८० धावांचे आव्हान ठेवलं आहे. राजस्थानकडून गोलंदाजी करताना संदीपने ५ विकेट घेतल्या.

सामन्याच्या सुरुवातीला राजस्थान संघाने सामन्यावर पकड ठेवली होती. तीन विकेट घेत मुंबईला दबावात ठेवलं होतं. परंतु नेहल वढेरा आणि तिलक वर्माने संयमी आणि शानदार खेळी करत मुंबईचा डाव सावरला. तिलक वर्मा आणि नहेल वढेरा यांच्या खेळीमुळे मुंबईने १७९ धावांचा पल्ला गाठला. तिलक वर्माने ४५ चेंडूत ६५ धावा केल्या. नेहल वढेराने २४ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. राजस्थानकडून संदीप शर्माने ५ बळी घेतले. ट्रेंट बोल्टने २ बळी घेतले. आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी १ विकेट घेतली.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्याच्या २ षटकात २ विकेट पडल्या. पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला आणि दुसऱ्याच षटकात इशान किशन पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला ट्रेंट बोल्टने संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले. तर इशान किशन खाते न उघडताच माघारी परतला. किशनला संदीप शर्माने झेल बाद केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सुर्यकुमार यालाही मोठी खेळी करता आली नाही

दोन्ही सांगांची खेळी ११

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (डब्ल्यूके/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT