India vs pakistan  saam tv
Sports

IND vs PAK, Weather Update: पावसाचं ठरलंय! राखीव दिवशीही १०० टक्के पावसाचा अंदाज, सामना रद्द झाल्यास काय होणार?

India vs Pakistan Latest News In Marathi: जर राखीव दिवशीही सामना रद्द झाला तर कसा लावला जाईल निकाल जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs Pakistan, Asia Cup 2023 Weather Update:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीत भारताचा सामना पाकिस्तानसोबत सुरू आहे. १० सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोळंबा घातला. त्यामुळे हा सामना ११ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी राखीव दिवस असल्याची घोषणा करण्यात आली होती. २४ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचं आगमन झाल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. दरम्यान यादिवशी कसं असेल कोलंबोतील हवामान? जाणून घ्या.

आजही जोरदार पाऊस?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजही कोलंबोत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता जोरदार पाऊस पडेल. त्यांनतर काही तास पाऊस थांबेल. मात्र दुपारनंतर पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळू शकते.

हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. भारतीय संघाने आतापर्यंत २४.१ षटकात २ गडी बाद १४७ धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाज या सामन्यात चांगलेच सेट झाले होते. मात्र त्यानंतर पावसाचे आगमन झाल्याने हा सामना थांबवावा लागला. जर राखीव दिवशीही हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही,तर हा दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल आणि सामना रद्दची घोषणा केली जाईल.

केवळ भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा...

भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ साखळी फेरीतील सामन्यामध्ये देखील आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाची पहिल्या डावातील फलंदाजी झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

आता सुपर ४ सामन्यातही पाऊस पडण्याची चिन्ह होती. त्यामुळे या सामन्यासाठी आशियाई क्रीडा मंडळाने राखीव दिवसाची घोषणा केली होती.मुख्य बाब अशी की, सुपर ४ फेरीत केवळ भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाची दमदार सुरुवात..

या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळाले आहे. हे आमंत्रण स्वीकार करत भारतीय सलामीवीर फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५६ तर शुबमन गिलने ५८ धावांची खेळी केली. दोघांमध्ये १२१ धावांची भागीदारी झाली. आता विराट कोहली आणि केएल राहुलची जोडी मैदानावर टीचुन फलंदाजी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

SCROLL FOR NEXT