IND vs PAK, Asia Cup 2023: ...म्हणून IND vs PAK सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला मिळाली संधी; समोर आलं मोठं कारण

Shreyas Iyer Ruled Out: श्रेयस अय्यर संघाबाहेर खरं कारण समोर आलं आहे.
kl rahul and shreyas iyer
kl rahul and shreyas iyersaam tv

IND vs PAK, Shreyas Iyer Ruled Out:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील सुपर ४ चा सामना सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला संघात स्थान दिलं गेलं आहे.

kl rahul and shreyas iyer
IND vs PAK, Playing XI : बुमराहच्या कमबॅकनंतर टीम इंडियात होणार २ मोठे बदल; पाकला आव्हान देण्यासाठी अशी असेल प्लेइंग ११

श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्याचं कारण काय?

या स्पर्धेतील सुरूवातीच्या २ सामन्यांमध्ये केएल राहुलला संधी दिली गेली नव्हती. साखळी फेरीतील पाकिस्तान आणि नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुल बाकावर बसून होता. जेव्हा पाकिस्तान संघाविरूद्ध रोहित शर्माने भारतीय संघाची यादी जाहीर केली. त्यावेळी या यादीत श्रेयस अय्यरचे नाव नव्हते. कर्णधार रोहितने याबाबत माहिती देत म्हटले की, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.

दुखापतीमुळे झाला होता संघाबाहेर..

श्रेयस अय्यर बॉर्डर- गावसकर ट्रॉफीदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएल २०२३ स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागले होते. त्याच्या पाठीच्या दुखण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची आशिया चषकासाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात केले होते. मात्र या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. (Latest sports updates)

kl rahul and shreyas iyer
IND VS PAK, Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे पुन्हा रद्द होणार? पाहा हवामानाचे लेटेस्ट अपडेट्स

भारतीय संघात २ बदल..

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात २ बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यात संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहचं या सामन्यात पुनरागमन झालं आहे. मोहम्मद शमीला विश्रांती दिली गेली आहे. तर श्रेयस अय्यर बाहेर गेल्यानंतर केएल राहुलचं संघात कमबॅक झालं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com