शांत आणि संयमी, मात्र अत्युच्च दर्जा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा क्रिकेटपटू अशी ओळख असलेला राहुल द्रविड टीम इंडियाची साथ सोडणार असल्याचं वृत्त आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. (Latest News)
प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी राहुल द्रविड करणार नाही. तशी शक्यता खूप कमी आहे, असं मानलं जात आहे. आयसीसी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर द्रविडचा प्रशिक्षकपदासाठीचा करारही संपुष्टात आला आहे. २०२१ मध्ये त्याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी द्रविडकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली होती.
आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार द्रविड?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड आणि आयपीएल फ्रेंचाइजी लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात कथितरित्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा खऱ्या ठरल्या तर, द्रविड आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ संघाचा मेंटॉर होऊ शकतो. पण हे सगळं द्रविड आणि बीसीसीआयमध्ये होणाऱ्या संभाव्य बैठकीतील निर्णयानंतरच निश्चित होऊ शकतं.
हे कसं शक्य आहे?
टीम इंडियाचं बिझी शेड्युल आणि दौऱ्यांमुळं द्रविडला आपल्या कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. जर आयपीएल संघाशी जोडला गेला तर, त्याला आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येऊ शकतो. कारण ही स्पर्धा केवळ दोन महिने असते. द्रविडला आपल्या ताफ्यात घेण्यास लखनऊ फ्रेंचाइजी प्रचंड उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. गौतम गंभीर कोलकाता संघाचा मेंटॉर असेल. त्यामुळे लखनऊच्या संघाचे पद रिक्त आहे.
जुन्या संघाकडून ऑफर
२००८ साली चॅम्पियन ठरलेल्या राजस्थान रॉयल्सलाही द्रविड मेंटॉर म्हणून हवा आहे, अशी जोरदार चर्चा आहे. द्रविडने यापूर्वी राजस्थान संघाचा खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिका निभावल्या आहेत. द्रविडने बराच काळ भारत अ आणि एनसीएसोबत काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.