Rahul dravid twitter
Sports

Rahul Dravid Head Coach: वर्ल्डकपसह राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला! कोण होणार टीम इंडियाचा हेड कोच?

Rahul Dravid Statement: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसह राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे.

Ankush Dhavre

Rahul Dravid News:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली होती.

आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार का? की राहुल द्रविड यांची पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

काय म्हणाले राहुल द्रविड?

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेता अंतिम सामना झाल्यानंतर राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेत द्रविडला मुख्य प्रशिक्षपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले की,'मी याबाबत काहीच विचार केलेला नाही. माझ्याकडे या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळही नव्हता. ज्यावेळी माझ्याकडे वेळ असेल तेव्हा मी याबाबत विचार करेल. माझं संपूर्ण लक्ष वर्ल्डकप स्पर्धेवर होतं. माझ्या डोक्यात वर्ल्डकप सोडून दुसरं काहीच सुरु नव्हतं. येणाऱ्या दिवसात काय होईल याबाबतही मी विचार केलेला नाही.'

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. मात्र माध्यमातील वृत्तानूसार बीसीसीआय आणि राहुल द्रविड यांच्यात याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाबाबत सर्वांची मतं वेगवेगळी होती. राहुल द्रविड यांची प्रशिक्षण देण्याची पद्धत अनेकांना खटकली होती. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा पराभव..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली.

तर विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT