Rahul Dravin-Virendra Sehwag Saam TV
क्रीडा

Cricket News : द्रविड शून्यावर बाद, तर सेहवागचं अर्धशतक; स्कोअर बोर्डवर अनेक वर्षांनी झळकली दिग्गजांची नावे

Cricket Under 16 Match : पहिल्या दिवसाच्या खेळात ज्युनियर द्रविडने चमकदार कामगिरी करता आलेली नाही. ज्युनियर सेहवागने सामन्यात आपली छाप सोडली आहे. आर्यवीर सेहवाग 50 धावा करून खेळत आहे.

प्रविण वाकचौरे

Cricket News :

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नावं सेहवाग आणि द्रविड आज दशकभरानंतर स्कोअर बोर्डवर झळकली आहेत. कर्नाटक आणि दिल्ली यांच्यात सोमवारपासून सुरू झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफी राष्ट्रीय 16 वर्षांखालील स्पर्धेत द्रविड आणि सेहवाग आमनेसामने आले आहेत.

कर्नाटक अंडर-16 संघाचा कर्णधार अन्वय द्रविड आणि दिल्लीचा फलंदाज आर्यवीर सेहवाग आपल्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळात ज्युनियर द्रविडने चमकदार कामगिरी करता आलेली नाही. ज्युनियर सेहवागने सामन्यात आपली छाप सोडली आहे. आर्यवीर सेहवाग 50 धावा करून खेळत आहे. (Latest News)

अन्वय हा भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक द्रविडचा मुलगा आहे. तो संघाचा यष्टिरक्षकही आहे. सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर हा त्याच्या वडिलांप्रमाणेच आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन दिवसीय सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी कर्नाटक संघाने फलंदाजी करताना 56.3 षटकात अवघ्या 144 धावा केल्या. द्रविडचा मुलगा अन्वय या डावात काही खास करु शकला नाही. त्याला खाते देखील उघडता आले नाही.

सेहवागच्या मुलाने ओपनिंग करताना शानदार अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवशी 50 धावा करून तो नाबाद परतला. आर्यवीर दुसऱ्या दिवशी बाद झाला. त्याने 8 चौकार आणि एक षटकारासह 54 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीचा संघ कर्नाटकवर भक्कम आघाडी घेताना दिसत आहे. अशा स्थितीत पाहिले तर आर्यवीर आणि अन्व य यांच्यातील लढतीत आत्तापर्यंत आर्यवीरच वर्चस्व गाजवत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT