Rahul Dravid Car Accident VIDEO 
Sports

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या कारचा अपघात, ऑटोनं दिली जोरदार धडक, भररस्त्यावर चालकासोबत हंगामा

Rahul Dravid Car Accident VIDEO : राहुल द्रविड याच्या कारचा अपघात झालाय. ऑटोने धडक दिल्याचे अपघातामध्ये दिसतेय, त्यानंतर रस्त्यावर राहुल आणि ऑटो चालकामध्ये काही प्रमाणात शाब्दीक वाद झाल्याचे दिसतेय.

Namdeo Kumbhar

Rahul Dravid Car Accident News : भाराताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या कारचा अपघात झालाय. बंगळुरूच्या रस्त्यावर राहुल द्रविडच्या कारला एका ऑटोने जोरदार धडक दिली. यामध्ये राहुल द्रविडच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राहुल द्रविडला राग अनावर आला, त्याने भररस्त्यावर ऑटो चालकासोबत वाद घातला. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

राहुल द्रविड याला संयमी आणि शांत म्हणून ओळखलं जाते. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील राहुल द्रविडला पाहून चाहत्यांना विश्वास बसणार नाही. मंगळवारी सायंकाळी राहुल द्रविड बंगळुरूमध्ये आपल्या कारने बाहेर पडला होता. त्यावेळी एका ऑटोने राहुल द्रविडच्या महागड्या कारला धडक दिली. त्यामुळे राहुल द्रविडला राग अनावर आला. रस्त्यावरच ऑटो चालकासोबत त्याचे तू तू मैं मैं झालं. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

ज्या ऑटो चालकाने कारला धडक दिली, त्यावर राहुल द्रविड वैतागलेला दिसत आहे. कन्नड भाषेत राहुल द्रविड त्या चालकासोबत बोलताना व्हिडीओत दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडच्या कारला एका मालवाहतूक करणाऱ्या ऑटोने धडक दिली. अपघातानंतर राहुल द्रविड आणि ऑटो चालकामध्ये जोरदार भांडण झालं. दरम्यान, अपघातग्रस्त कार राहुल द्रविड स्वत: चालवत होता का? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

IANS च्या रिपोर्ट्सनुसार, बंगळुरूमधील कनिंघम रोड या वर्दळीच्या ठिकाणी राहुल द्रविडच्या कारचा अपघात झाला. राहुल द्रविड इंडियन एक्सप्रेस जंक्शनवरून हाय ग्राउंड्सकडे जात होता, त्यावेळी ही घटना घडली. राहुल द्रविडची कार ट्रॅफिकमध्ये होती, त्यावेळी ऑटो चालकाने मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर राहुल द्रविड आणि चालकामध्ये बाचाबाची झाली. राहुल द्रविडने ऑटो चालकाचा क्रमांकही घेतल्याचे समजते.

डेक्कन हेराल्डच्या रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्य आसपास रहुल द्रविडच्या कारचा अपघात झाला. या अपघाताबाबत राहुल द्रविडने कोणताही तक्रार अथवा गुन्हा दाखल केला नाही. राहुल द्रविडने ऑटो चालकाचा क्रमांक आणि ऑटोच रजिस्ट्रेशन क्रमांक नोट करून घेतला अन् घटनास्थळावरून रवाना झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT