राहूल द्रविड भारतीय संघाचा कोच होणार? BCCI ने टाकलं पहिलं पाऊल Saam Tv
Sports

राहूल द्रविड भारतीय संघाचा कोच होणार? BCCI ने टाकलं पहिलं पाऊल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) क्रिकेट प्रमुखांसाठी अर्ज मागवले आहेत.

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) क्रिकेट प्रमुखांसाठी अर्ज मागवले आहेत. हे पद सध्या भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) कडे आहे. त्याचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने या पदासाठी अर्ज आमंत्रित करणे म्हणजे राहुल द्रविडला लवकरच त्याच्या पदावरून काढून टाकले जाईल. यासह, याचा अर्थ असा की लवकरच राहुल द्रविडला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकला बनवले जाऊ शकते. सध्या हे पद माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) सांभाळत आहेत. त्यांचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी -20 विश्वचषकानंतर संपत आहे.

राहुल द्रविडची 8 जुलै 2019 रोजी एनसीए क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. आता नवीन व्यक्ती ज्याला या पदावर आणले जाईल, त्याचा कार्यकाळ देखील दोन वर्षांचा असेल. बीसीसीआयने राहुल द्रविडसाठी अर्ज मागवण्याची गरज नव्हती, परंतु आता याचा अर्थ राहुलला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जर राहुलला पुन्हा या पदावर यायचे असेल तर त्याला पुन्हा अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, राहुल द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतो, पण रवी शास्त्रीचा कार्यकाळ टी -20 विश्वचषकानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये संपत आहे आणि द्रविड राष्ट्रीय संघाचा भाग असण्याची शक्यता आहे. राहूल मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. काहीही झाले तरी तो या व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिल. मुख्य प्रशिक्षकासाठी वयोमर्यादा 60 वर्षे आहे. रवी शास्त्री मे मध्ये 59 वर्षांचे झाले आहेत.

अलीकडेच, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचा दुसरा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तेथे त्यांनी एकदिवसीय मालिका जिंकली, तर टी -20 मालिका गमावली. या मालिकेनंतर राहुलला भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्याने उत्तर दिले प्रामाणिकपणे सांगायचे तर मी खरोखर फार पुढे काही विचार केला नाही. मी जे करत आहे ते करण्यात मला आनंद मिळतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT