Shikhar Dhawan Saam TV
Sports

IND vs SA: शिखर धवनला संघात न घेण्याचा निर्णय राहुल द्रविडचा, कारण आले समोर

राहुल द्रविडने हा निर्णय मोठा विचार करुन घेतला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Pravin

साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी (IND va SA T20 Series) भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. तीन वर्षानंतर दिनेश कार्तिकला (Dinesh Kartik) भारतीय संघात स्थान मिळाले आहे. दिनेश कार्तिकला आयपीएलमधिल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संघात शिखर धवनला (Shikhar Dhawan) स्थान देण्यात आलेले नाही. यंदाचा हंगाम शिखर धवनसाठी काही खास नव्हता. माध्यमाच्या अहवालानुसार शिखर धवनला बाहेर ठेवण्याचा निर्णय राहुल द्रविडचा होता. हा निर्णय घेण्यासाठी राहुल द्रविडला मोठा विचार करावा लागला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की रविवारी झालेल्या बैठकीत हेड कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात संघ कसा असावा यावर चर्चा केली होती. राहुल द्रविडने निवडकर्त्यांना सांगितले की आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता युवा खेळाडूंना संधी दिली जावी. त्यानंतर राहुल द्रविडने शिखर धवनला स्वत: फोन करुन सांगितले की मला आगामी विश्वचषकासाठी युवा खेळाडूंचा संघ हवा आहे. संघासाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे.

दिनेश कार्तिकल कुठे तरुण आहे?

राहुल द्रविड बरोबर आहे यात शंका नाही. तो भविष्यातील टीम इंडिया बनवत आहे पण प्रश्न असा आहे की जर शिखर धवनची निवड युवा खेळाडूंचे कारण देत नाही नसेल तर दिनेश कार्तिक तरुण आहे का? दिनेश कार्तिक आणि शिखर धवन दोघेही 36-36 वर्षांचे आहेत, मग कार्तिकची खेळाडूची निवड कशी झाली? दिनेश कार्तिकला निवडण्यासाठी आणि धवनला बाहेर ठेवण्यासाठी कोणते वेगळे नियम वापरले जातात?

शिखर धवन सर्वोत्तम खेळाडू

आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकने अप्रतिम कामगिरी केली आहे यात शंका नाही पण धवन कुठेही कमी नाही. या हंगामातही धवनने 14 सामन्यात 460 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 38.88 आहे. सलग 7 व्या मोसमात त्याने 400 हून अधिक धावा केल्या आहेत. धवनचा स्ट्राईक रेट 125 पेक्षा जास्त आहे. धवन हा आयपीएलमध्ये 700 हून अधिक चौकार आणि सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे. एवढी उत्कृष्ट आकडेवारी आणि कामगिरी असूनही, धवनला वयोमानानुसार वगळण्यात आले आहे, तर कार्तिक संघात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Face Acne : पिंपल्स होतील गायब, चेहऱ्यावर लावा 'हा' फेसमास्क

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT