Team India News: वर्ल्डकप जिंकूनही राहुल द्रविड नाराज? विराट कोहलीकडे केली ही खास मागणी
virat kohli rahul dravid twitter
क्रीडा | T20 WC

Team India News: वर्ल्डकप जिंकूनही राहुल द्रविड नाराज? विराट कोहलीकडे केली ही खास मागणी

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत अजेय राहत वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. त्यावेळी एमएस धोनी भारताचा कर्णधार होता. तर यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना हा कारनामा केला आहे. वर्ल्डकपसह राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे. दरम्यान कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी विराट कोहलीकडे खास मागणी केली आहे.

विराट कोहलीने आयसीसी टी -२० वर्ल्डकप, आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्या आहेत. आता केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणं शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे राहुल द्रविड यांनी म्हटलंय की, मर्यादित षटकातील सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. आता केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणं शिल्लक आहे.

भारतीय संघाने यापूर्वी २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २०२५ होणाऱ्या स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे ही ट्रॉफी उंचावण्याची आणखी एक संधी असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २०२१ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. तर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतीय संघाला आता तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळू शकते. यावेळी भारतीय संघ पूर्ण जोर लावताना लाऊ शकतो. यासह भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Photo : हाथरसमधील दुर्घटनेनंतर राहुल गांधींनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

Marathi Live News Updates: माकपची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी

Wardha News : वर्धेतून दुचाकी चोरी करत वाशिमला विक्री; आर्वी पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश, २३ दुचाकी जप्त

Pune News: बॉडी बिल्डिंग करणाऱ्यांनो सावधान, पुण्यात स्टेरॉइडची होतेय विक्री; पाहा VIDEO

Team India Celebration: वंदे मातरम सुरु असताना फॅनने हार्दिकच्या हातात फेकला टी-शर्ट, बुमराहने दिलेली रिॲक्शन व्हायरल

SCROLL FOR NEXT