Rahkeem Cornwall Run Out twitter
Sports

Rahkeem Cornwall : हा तर इंजमाम उल हकपेक्षाही स्लो! क्रिकेट इतिहासातील सर्वात वजनदार खेळाडूच्या रन आउटचा मजेशीर Video व्हायरल

Rahkeem Cornwall Run Out caribbean premier league: त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Rahkeem Cornwall Run Out Viral Video:

सध्या कॅरिबियन प्रिमीयर लीग २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत गुरूवारी सेंट लुसिया किंग्स आणि बार्बाडोस रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात बार्बाडोस रॉयल्स संघाला ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात बार्बाडोस रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाज रहकिम कॉर्नवॉल ज्या पद्धतीने धावबाद झाला आहे, ते पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बार्बाडोस रॉयल्स संघातील हा फलंदाज १ चेंडू खेळून एकही धाव न करता माघारी परतला. मात्र ज्या पद्धतीने तो बाद झाला ते खुप लाजिरवाणे होते. सेंट लुसिया किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ६ गडी बाद २०१ धावा केल्या होत्या. यादरम्यान सीन विलियम्सने ४७ तर फाफ डू प्लेसीने ४६ धावांची खेळी केली.

कॉर्नवॉलच्या रनआऊटचा व्हिडिओ होतोय व्हायरल..

बार्बाडोस रॉयल्स संघाची फलंदाजी सुरू असताना मॅथ्यू फोर्डे पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्याने सुरूवातीला एक अतिरीक्त धाव खर्च केली. पुढच्याच चेंडूवर त्याचा चेंडू रहकिम कॉर्नवॉलच्या पॅडला जाऊन धडकला. चेंडू पॅडला लागून शॉर्ट फाइनच्या एरियाच्या दिशेने गेला. (Latest sports updates)

तिथे ख्रिस सोले क्षेत्ररक्षण करत होता. क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा तोल गेला. मात्र त्याने लगेच स्वत:ला सावरलं आणि चेंडू उचलून नॉन स्ट्राईकच्या दिशेने फेकला. चेंडू इतक्या लांब गेला होता की, रहकिम कॉर्नवॉल आरामात पोहचू शकला असता.

मात्र तो गार्डनमध्ये चालण्यासाठी निघालाय असा धावत होता. ज्यावेळी चेंडू स्टम्पला लागला त्यावेळी तो फ्रेममध्येही दिसत नव्हता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होउ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT