राफेल नदाल Saam TV
Sports

Tennis News: राफेल नदालची बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार

बार्सिलोना येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एटीपी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालचे स्पर्धात्मक टेनिसमधील पुनरागमन अनिश्चित झाले आहे.

वृत्तसंस्था

माद्रिद : बार्सिलोना येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एटीपी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालचे स्पर्धात्मक टेनिसमधील पुनरागमन अनिश्चित झाले आहे. ‘‘सध्या बरगडीच्या दुखापतीने ग्रस्त असलेला राफेल नदाल बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार नाही. तसेच तो पुढे कोणत्या स्पर्धेतून पुनरागमन करेल, हे सांगणे अद्याप कठीण आहे.’’ अशी माहिती त्याच्या संघाच्या व्यवस्थापकाने वृत्तसंस्थेला दिली आहे. (Rafel Nadal Backs out from ATP Tennis Tournament)

हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस (Tennis) स्पर्धेचे विजेतेपद मिळवून आपले विक्रमी २१ ‘ग्रँडस्लॅम’ जेतेपद पटकावणाऱ्या नदालला गेल्या महिन्यात त्याच्या बरगडीच्या दुखण्यामुळे सहा आठवड्यांपर्यंत टेनिसपासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर ३५ वर्षीय नदालने आता बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेतून (Sports) माघार घेतल्याने त्याचे टेनिस कोर्टवरील पुनरागमन लांबणीवर पडले आहे.

नदालला गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया येथील इंडियन वेल्स येथे झालेल्या ‘एटीपी १०००’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धावताना छातीत त्रास झाला होता. त्यानंतर बार्सिलोनात झालेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या बरगडीला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले होते.

माद्रिद आणि रोममध्ये पुढील महिन्यात ‘एटीपी मास्टर्स १०००’ स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्यानंतर, नदाल २२ मे ते ५ जून दरम्यान होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमघ्ये सामने खेळण्यासाठी अपेक्षा आहे. राफेलने आत्तापर्यंत विक्रमी १३ वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविलेले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

ISRO ने इतिहास रचला! वजनदार सॅटेलाइट केला लाँच, मोबाइल नेटवर्कमध्ये बदल होणार

SCROLL FOR NEXT