ind vs aus saam tv
क्रीडा

IND VS AUS:अश्विनचा नादच करायचा नाय !१ गडी बाद करताच उद्ध्वस्त केले हे '३' मोठे विक्रम

भारतीय संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Saam TV News

IND VS AUS: नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघातील गोलंदाजांनी आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान भारतीय संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनच्या(R Ashwin) नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. आता या यादीत आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ॲलेक्स कॅरीला बाद करताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. अश्विन सुरुवातीला यश मिळवण्यात अपयशी ठरला होता. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत ॲलेक्स कॅरी आणि कर्णधार पॅट कमिन्सला माघारी धाडलं.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज.

अनिल कुंबळे: ६१९

आर अश्विन -४५१

कपिल देव:४३४

हरभजन सिंग :४१७

जहीर खान :३११

ईशांत शर्मा :३११

बिशनसिंग बेदी :२६६

रवींद्र जडेजा :२४५

सर्वात जलद ४५० गडी बाद करणारे गोलंदाज.

मुथय्या मुरलीधरन : ८० सामने

आर अश्विन : ८९ सामने

अनिल कुंबळे :९३ सामने

ग्लेन मॅकग्रा :१०० सामने

शेन वॉर्न :१०१ सामने

आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय. कसोटी क्रिकेटमध्ये ४५० गडी बाद करत तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी पोहोचला आहे. केवळ ९ गडी बाद करताच तो नॅथन लायनला देखील मागे सोडू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने १३३ सामन्यांमध्ये ८०० गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT