Surabhi Jayashree Jagdish
भारतीय घरांमध्ये चपाती हा रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. ती बहुतेक वेळा डाळ, भाजी यांसोबत खाल्ली जाते. म्हणूनच रोटीला आपल्या आहारात विशेष स्थान आहे.
चपातीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे घटक आणि भरपूर फायबर असते.यामुळे ती आरोग्यासाठी चांगली मानली जाते. ती सकाळ, दुपार आणि रात्रीच्या जेवणात खातात.
पण चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती हेही महत्त्वाचे आहे. योग्य वेळी खाल्ल्यास तिचे फायदे अधिक मिळतात. म्हणूनच याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.
चपाती पचायला साधारण दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून ती दिवसा खाणं अधिक योग्य मानलं जातं. यामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
विशेषतः दुपारच्या जेवणात चपाती खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दिवसभराच्या हालचालींमुळे ती नीट पचतं. यामुळे शरीराला योग्य ती ऊर्जा मिळते.
रात्री रोटी खाणं शक्यतो टाळावं असं सांगितलं जातं. कारण त्यातील फायबर हळूहळू पचतं आणि पचन प्रक्रिया चालू राहते. यामुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
वजन कमी करायचं असल्यास रात्री भाताऐवजी चपाती खाणं चांगलं. पण ती रात्री ७ वाजण्यापूर्वी खावी आणि नंतर थोडं चालावं. तसंच झोपण्यापूर्वी २-३ तास आधी हलकं जेवण करणं उत्तम ठरतं.