Surabhi Jayashree Jagdish
भारतीय जेवणात डाळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रोटीन आणि पोषणासाठी डाळ आवश्यक असते.
भारतामध्ये अरहर, उडीद, मसूर आणि मूग अशा अनेक डाळी उपलब्ध आहेत. प्रत्येक डाळीची चव आणि गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणूनच सर्व डाळींचा परिणाम शरीरावर सारखा नसतो.
काही डाळी पोटासाठी जड पडू शकतात. त्यामुळे काहींना गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो.
म्हणून योग्य डाळ निवडणं महत्त्वाचं ठरतं.
लाल मसूर डाळ पटकन शिजते आणि मऊ होते. ही डाळ पोटासाठी हलकी असल्यामुळे सहज पचते. म्हणून अपचनाचा त्रास कमी होतो.
मूग डाळ आयुर्वेदनुसार पचनासाठी उत्तम आहे. ही डाळ सर्वात हलकी आणि सहज पचणारी मानली जाते. आजारी, लहान मुले आणि वृद्धांसाठी ही डाळ उत्तम असते.
अरहर डाळ सामान्यतः पचायला सोपी असते. पण काही लोकांना ती खाल्ल्यावर गॅस होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीरानुसार ती घ्यावी.
डाळ शिजवण्यापूर्वी किमान 30 मिनिटे पाण्यात भिजवावी. यामुळे त्यातील अपचन करणारे घटक कमी होतात. यामुळे डाळ अधिक सहज व जलद पचते.